Skip to main content

Posts

Showing posts from April, 2020

बाबा बंगाली

काही माणसांशी आपली मैत्री का होते, कशी होते आणि अचानक ती का तुटते, याचं उत्तर ' योगायोग ' याशिवाय वेगळं काही मिळणं कठीण असतं. मुळात ती मैत्री होणंच एक मोठं आश्चर्य असू शकतं. कोणाशीही चटकन संवाद साधू शकणाऱ्या आणि चित्रविचित्र माणसांची सोबत आवडणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीवर मुद्दाम एखाद्या व्यक्तीपासून लांब राहायचा प्रयत्न करायची वेळ तशी अभावानेच आलेली आहे. तनजीब हुसेन नावाच्या नावाचा बांगलादेशी महाभाग माझ्या आयुष्यात असाच अपघाताने आला आणि त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात अपघातांची मालिका सुरु होईल की काय, अशी भीती वाटून कधी नव्हे तो मी त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी जीवाचा चांगलाच आटापिटा करून घेतला. सुरुवातीच्या काळात दुबईला एका खोलीत दोन ते तीन डोकी अशा पद्धतीचं राहणं नशिबात आलेलं होतं. अशा प्रकारे राहताना बरोबरीची व्यक्ती कोणत्या गावची , पार्श्वभूमीची आणि संस्कृतीची आहे, हे काही दिवसात हळू हळू उलगडत जाणाऱ्या ओळखीतून समजत जाई. आपल्याकडच्या चाळीत भाडेकरू मालकावर डाफरू शकतो, पण दुबईला मात्र स्वच्छता आणि वेळेवर भाडं या दोन गोष्टी सोडल्या तर इतर कोणत्याही गोष्टींवरच्या तक्रारील

केरळचा बहिर्जी

मल्याळी माणसांशी माझं विशेष संबंध आखाती देशांमध्ये काम करतानाच आला. मुंबईला मुळात मल्याळी लोक तसे कमीच, त्यात मुंबईला एकदा राहायला सुरुवात झाली, की मल्याळीच काय पण अगदी परग्रहवासी सुद्धा सहज मुंबईकर होत असल्यामुळे शाळा-कॉलेजमध्ये भेटलेले मल्याळी महाभाग मला फारसे वेगळे कधीच वाटले नाहीत. एक-दोन मित्रांच्या घरी गेल्यावर तितक्यापुरते कानावर पडलेले जड मल्याळी उच्चार आणि एका मैत्रिणीच्या मुंबईतच पार पडलेल्या लग्नसमारंभात केरळहून अगदी पारंपारिक वेशात आलेले शंभर-एक वऱ्हाडी यापलीकडे विशुद्ध मल्याळी अनुभव माझ्यापाशी नसल्यातच जमा होते. या सगळ्यामुळे असेल, पण देशाबाहेर पडून दुबईला आल्यावर जिथे तिथे भेटणारे मल्याळी लोक आणि अगदी समुद्रापार वेगळ्या देशात येऊनही त्यांनी नेटाने जपलेली त्यांची संस्कृती हा माझ्यासाठी नवा अनुभव होता. राहायची सोय करायच्या दृष्टीने दुबई मध्ये शोधाशोध सुरु केली आणि मला आश्चर्याचा धक्का बसायला सुरुवात झाली. जिथे तिथे " तू मल्याळी आहेस का?" अशी विचारपूस आणि " नाही" हे माझं उत्तर ऐकल्यावर " सॉरी बॉस..." असं नकारार्थी उत्तर हा अनुभव येत होता. सुरु

पूर्ण झालेला अपूर्णांक

एके दिवशी सकाळी ऑफिसमध्ये चहा घेत असताना अचानक समोर एक मिठाईचा भला मोठा डबा घेऊन आमचा 'ऑफिस बॉय' आला. इतका मोठा डबा, त्यात तऱ्हेतऱ्हेची वर्ख लावलेली मिठाई आणि वर अजून एका छोट्या डब्यात प्रत्येकाला वेगळी चॉकलेट्स हे सगळं नक्की कशासाठी चाललंय याचा मला उलगडा होईना. शेवटी त्याने " वो हाला है ना, उसको बेटा हुआ...उसकी मिठाई है..." अशी माहिती पुरवली. मिठाई हातात घेऊन मी काहीश्या गोंधळलेल्या अवस्थेत आजूबाजूच्यांकडे बघायला लागलो. त्यांची अवस्था सुद्धा काही वेगळी नव्हती. आम्ही पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी 'आपल्याच डिपार्टमेंटमधली हाला' की अजून कोणती, असा आमच्या त्या 'ऑफिस बॉय' ला विचारलं. अक्ख्या ऑफिसच्या खबरबाता बहिर्जी नाईकचा केरळी वंशज असल्याच्या बेमालूमपणे काढून आणण्यात हा मनुष्य पटाईत होता. त्याच्या तोंडून ' तीच हाला' अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यावर आमच्यात कुजबूज सुरु झाली. " अरे ती प्रेग्नन्ट होती असा कधी वाटलंच नाही...नवव्या महिन्यापर्यंत इतकी कशी बारीक राहू शकेल कोणी?" " दत्तक नाही ना घेतलं मूल ? विचारलं पाहिजे लिजोला...&q

एक होता विदूषक

शब्दविभ्रम, नक्कल, मिमिक्री, डबिंग अशा अनेक गोष्टींमध्ये कमीजास्त प्रमाणात निपुण असणारी अनेक कलाकार मंडळी आपल्याला दृश्य आणि अदृश्य माध्यमांतून अगदी दररोज भेटत असतात.जाहिरातींच्या क्षेत्रात काम करत असणारी चेतन सशीतल, सुदेश भोसले, मेघना एरंडे अशी मंडळी शेकडो कलाकारांचे आवाज जेव्हा लीलया काढून दाखवतात, तेव्हा काही क्षण आपले डोळे, कान आणि मेंदू एकत्र काम करत आहेत की नाही अशी शंका सतत येत रहाते. संवाद, आवाज आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या भावना याचं काही क्षणात आपल्या मनावर खोल ठसा उमटत असतो आणि म्हणून कदाचित दृक्श्राव्य माध्यम हे इतर कोणत्याही माध्यमांपेक्षा जास्त परिणामकारक आहे, असं जगातल्या अनेक तज्ज्ञांचं ठाम मत आहे. म्हणूनच असेल कदाचित, पण चार्ली चॅप्लिन अथवा लॉरेल-हार्डी ची जाड्या-रड्याची दुक्कल जेव्हा जेव्हा मी जुन्या कृष्णधवल मूकपटांमध्ये बघतो, तेव्हा त्यांच्या त्या काळात त्यांनी करून ठेवलेल्या अफाट कामाची महती कळते. आवाजाचं आणि रंगांचं माध्यम नसूनही त्यांनी केवळ दमदार कथानक, विलक्षण बोलका चेहरा आणि अतिशय विचारपूर्वक लावलेले कॅमेरा-अँगल या त्रिसूत्रीचा जोरावर आजच्या काळातही कालबाह्य

जुळ्यांचं दुखणं

काही सेकंदांच्या अंतराने एकाच आईच्या पोटी एकाच प्रसूतिगृहात एकाच दिवशी जन्माला आलेल्या दोन जुळ्या भावंडांची कुंडली अगदी तंतोतंत एकसारखीच असायला हवी , अशी शंका मला कुंडलीशास्त्राबद्दल वाचत असताना नेहेमी येत असे. अधून मधून त्या विषयातल्या काही तज्ज्ञ मंडळींना मी त्यासंबंधी प्रश्न सुद्धा करत असे आणि माझ्या मनाचं त्यांच्यापैकी कोणाच्याही उत्तराने समाधान होतं नसे. पूर्वजन्मीच्या संचिताचे परिणाम प्रत्येक आत्म्यावर वेगवेगळे होतं असतात, असं साधारण उत्तर प्रत्येकाकडून मला मिळत असे. मुळात विज्ञान, गणित, शास्त्र याच्या कसोट्यांवर प्रत्येक गोष्ट पारखून घ्यायची आणि तर्कशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीचं उत्तर शोधणाऱ्या माझ्या पिढीला " आमच्या वडिलांनी सांगितलेला म्हणून आम्ही मान्य केलं " च्या धर्तीवर उत्तरं देणाऱ्या महाभागांचं वावडं, आणि त्यात ज्योतिषासारख्या आणि पुनर्जन्मासारख्या अंधश्रद्धा आणि विज्ञानाच्या पुसटश्या सीमारेषेवरच्या विषयातून त्या जुळ्यांच्या प्रश्नावर समाधानकारक उत्तर न सापडल्यामुळे इतर अनेकांप्रमाणे ज्योतिष म्हणजे काहीतरी खुळचटपणा आहे, असं माझं मत तयार होऊ लागलं होतं. माझे &#

भगीरथ

" शुभ संध्याकाळ, मन्सूर बोलतोय.उद्या किती वाजता आणि कुठे भेटायचंय?" दिवसभराचं काम संपवून घरी निघालेलो असताना गाडीत बसणार तोच मोबाईल खणखणला आणि पलीकडून अपरिचित माणसाचा परवलीचा प्रश्न आला. दर वेळी नवा प्रोजेक्ट हातात आलं, की सुरुवातीची 'किक-ऑफ' मीटिंग होते आणि मग त्या प्रोजेक्टशी जोडलेले कोण कोण कुठून कुठून असेच फोन करत असतात. ' साईट व्हिसिट' च्या वेळी सगळे जण एकत्र आले, की संभाषणातून काही वेळातच त्यातले 'सुपीक मेंदू' आणि 'नुसत्याच कवट्या' कोण आहेत हे सरावाने आता मला ओळखता येत असल्यामुळे मी माझ्या प्रोजेक्ट ची पहिली मीटिंग 'साईट'वर घेणं पसंत करतो. मुळात कोणत्याही प्रोजेक्टची टीम मोठी असल्यामुळे त्यात उडदामाजी काळे गोरे असतातच, त्यात एकेकाचे स्वभाव, अहंकार, कामाची पद्धत कधीही सारखी नसल्यामुळे बरेच वेळा खटके उडणं स्वाभाविक असतं. त्यामुळे ऑफिसच्या वातावरणाबाहेर प्रत्यक्ष साईटवर सगळ्यांना पहिल्यांदा एकत्र आणणं संवादाच्या दृष्टीने फायदेशीर असतं. आमच्याच दुसऱ्या ऑफिस ब्रांच मधला हा मन्सूर अब्दुल हादी नावाचा कुवैती इंजिनिअर आमच्या ' जलशुद्धी

मानसीचा चित्रकार तो

काही व्यक्तींना जन्मजात कलाकार होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांची देणगी मिळालेली असते। अशा व्यक्तींना कला शिकवावी लागत नाही. दूध पित्या वयातल्या आणि बोबडे शब्द बोलायला लागलेल्या लहानशा मुलाला गाणं ऐकून तंद्री कशी लागते, याचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शोध घेणं मला तरी अशक्य वाटतं. कुठल्याशा पूर्वजन्मीच्या ऋणानुबंधातून जन्मजात बरोबर आलेली ही शिदोरी ज्याच्याजवळ असते, ती व्यक्ती माझ्या मते विधात्याने केवळ सर्वसामान्य मनुष्यप्राण्यांच्या आयुष्यात चार आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठीच गंधर्वलोकातून खास या पृथ्वीतलावर पाठवलेली असते. कलियुगातील हे कोरडं आणि यांत्रिक जग अशा व्यक्तींच्या असण्यामुळे खऱ्या अर्थाने 'जिवंत' राहिलेलं आहे यावर माझा तरी ठाम विश्वास आहे. ज्या शहराला भूलोकीवरच्या सर्वाधिक सुंदर आणि नीटनेटक्या शहराच्या यादीत अव्वल क्रमांक अनेक वर्ष मिळालेला आहे, अशा प्राग शहरात जायचा योग्य माझ्या आयुष्यात थोड्या उशिराने आला असला, तरी स्थापत्यशास्त्र, कला, संगीत आणि तत्सम अनेक 'जिवंत आणि रसरशीत' गोष्टींवर मनापासून प्रेम असल्यामुळे हाती आलेल्या या संधीचं सोनं क