Skip to main content

Posts

Showing posts from February, 2020

ध्येयवेडा

मागच्या पंचवीस वर्षांपासून जगाची एकमेव महासत्ता हे बिरुद अभिमानाने मिरवणाऱ्या अमेरिकेत जाऊन अनेक जाती-धर्म-पंथ-देशाच्या लोकांनी आपली भरभराट करून घेतलेली आहे. संधींची उपलब्धता, गुणग्राहकता, विचारस्वातंत्र्य आणि मेहेनतीचा हमखास मिळणार परतावा अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे अमेरिकेला जाऊन तिथलं नागरिकत्व मिळवणं आणि त्यानंतर सुखसमृध्दीचं जीवन जगणं ही स्वप्न बाळगणारे हजारो तरुण जगाच्या कानाकोपऱ्यातून अमेरिकेत वास्तव्याला गेले. मागील काही वर्षांपासून मात्र अनेक राजकीय कारणांनी या 'अमेरिकन ड्रीम' ला अमेरिकेच्याच राजकारण्यांनी वेसण घालायचं काम करायला सुरुवात केली, ज्यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रस्थापित झालेला एक ' पॅटर्न' कुठेतरी खंडित झाला. आजसुद्धा अनेक लोक या ना त्या पद्धतीने अमेरिकेत प्रवेश करून तिथल्या 'ग्रीन कार्ड' च्या मागे लागलेले दिसतात। अरब जगतात काही ना काही करून अमेरिका किंवा अगदीच नाही जमलं तर कॅनडाच्या नागरिकत्वाचे तरी सोपस्कार पूर्ण करून आपल्या देशाच्या नागरिकत्वातून स्वतःची आणि कुटुंबीयांची 'सुटका' करण्याची चढाओढ चाललेली दिसते. सीरिया, लेबनॉन, पॅ

मक्केचा नेक बंदा

" मी या केकला हात लावू शकणार नाही. मला तू केक देतोयस यासाठी तुझे आभार मानतो, पण मी तो खाऊ शकणार नाही." फादी मला नम्रपणे पण ठाम शब्दात नकार देत होता. आजूबाजूचे माझे मित्र मला ' कशाला त्याच्या फंदात पाडतोयस.....सोड ना......' सारखे सल्ले देत मला बाजूला ओढत होते. ऑफिसमध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापून मी सगळ्यांना वाटत होतो. बाकी कोणीही काहीही कुरबूर केली नाही, पण हा मात्र अडून बसला. शेवटी जास्त मस्का मारण्यापेक्षा सरळ निघावं असा विचार करून मी इतरांकडे गेलो. त्याने मला ' माफ कर....गैरसमज नको करून घेऊस ' असं पुन्हा एकदा सांगितलं. मी नाखुशीनेच त्याला ' ठीक आहे' छापाचं उत्तर दिलं आणि ' गेला उडत' असा मनोमन म्हणत बाकीच्यांबरोबर दिवस साजरा केला. संध्याकाळी खाली उतरल्यावर गाडीत बसताना मागून मला याचा आवाज  ऐकू आला " थांब....मला बोलायचंय " 'फादी? केक संपला केव्हाच....' ' नाही, त्यासाठी नाही. तुला गैरसमज नको म्हणून सांगतोय, माझ्या धर्मात वाढदिवस आणि केक या गोष्टींना महत्व नाही, म्हणून मी माझ्या घरी सुद्धा हे सगळं करत नाही. मा

शांतताप्रिय लढवय्या

जगाच्या पाठीवरच्या अनेक शापित देशांपैकी एक म्हणजे इराक हा अरबस्तानाच्या वायव्य टोकाला असलेला देश। तैग्रिस आणि युफ्रेटीस नद्यांमुळे या प्रांतात सुमेरियन, असिरिअन, बाबीलोनिअन, मेसोपोटेमियन अश्या अनेक समृद्ध संस्कृती नांदल्या. एकेकाळचा हा समृद्ध आणि संपन्न देश आज पाश्चात्य देशांच्या हातातल खेळणं झालेला आहे आणि मागच्या १०० वर्षातल्या सततच्या लढाया, वांशिक नरसंहार, शेजारच्या देशाबरोबरचे तंटे अशा अनेक कारणांनी पार खिळखिळा होऊन गेलेला आहे. ब्रिटिश आणि फ्रेंच राज्यकर्त्यांनी १०० वर्षांपूर्वी पेरलेली दुहीची बीजं आज इतकी अक्राळविक्राळ फोफावली आहेत की त्यात अक्खा देश पोखरून निघालेला आहे. मुळात अरब, कुर्द, पर्शियन, येझदी, शबक, काकाई, रोमा, सिरकॅसियन आणि बदाऊनी अश्या अनेक जात-पंथाचे आणि त्यात पुन्हा शिया-सुन्नी या इस्लामच्या दोन शाखांमध्ये विभागले गेलेले लोक हा या देशाच्या विविधतेचा जरी नमुना असला, तरी या विविधतेत एकता मात्र नसल्यामुळे पाश्चात्यांनी या देशावर मनसोक्त डल्ला मारलेला आहे. याच इराकच्या उत्तर भागात असलेल्या मोसूल शहरात जन्मलेला, वाढलेला आणि शिकलेला मोहम्मद समीर नावाचा आर्किटेक्ट माझ्य

' ताप ' गंधर्व

संगीत आणि त्यातही शास्त्रीय संगीत हा माझा जिव्हाळ्याचा विषय . आजच्या पंजाबी वळणाच्या आणि केवळ ठेक्यावर जोर देत गायला जाणाऱ्या गाण्यांचा मला प्रचंड तिटकारा आहे .  किंबहुना ही गाणी ' तयार ' करावी लागतात हे मला पटत नाही आणि म्हणूनच हे सगळं मला बरंचसं सपक वाटतं . कवितेचे शब्द , भाव , त्यात अभिप्रेत असलेला अर्थ याचा सखोल विचार करून सुरांना त्या शब्दांमध्ये अलगद गुंफायची कला प्रचंड तपस्या   करून मिळते , म्हणूनच असेल कदाचित , पण आजच्या ' फास्ट फूड ' च्या जमान्यात फार कमी वेळा अशी गाणी ऐकायला मिळतात . दुबईला महाराष्ट्र मंडळात अधून मधून शास्त्रीय संगीत आणि भावसंगीताचे कार्यक्रम होत असतात , जे माझ्यासारख्या ' जुन्या वळणाच्या ' संगीतप्रेमींना पर्वणीसारखे वाटतात . इथे संजीव अभ्यंकर यांच्यापासून अगदी संदीप - सलील यांच्या अतिशय गोड गाण्यांचे कार्यक्रम मी अनेक वेळा पाहिले आहेत . अशा कार्यक्रमाला बहुतेक श्रोते मध्यम वयाचे असले , तरी त्या सगळयांमध्ये मी माझी खुर्ची आग