" मी या केकला हात लावू शकणार नाही. मला तू केक देतोयस यासाठी तुझे आभार मानतो, पण मी तो खाऊ शकणार नाही." फादी मला नम्रपणे पण ठाम शब्दात नकार देत होता. आजूबाजूचे माझे मित्र मला ' कशाला त्याच्या फंदात पाडतोयस.....सोड ना......' सारखे सल्ले देत मला बाजूला ओढत होते. ऑफिसमध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापून मी सगळ्यांना वाटत होतो. बाकी कोणीही काहीही कुरबूर केली नाही, पण हा मात्र अडून बसला. शेवटी जास्त मस्का मारण्यापेक्षा सरळ निघावं असा विचार करून मी इतरांकडे गेलो. त्याने मला ' माफ कर....गैरसमज नको करून घेऊस ' असं पुन्हा एकदा सांगितलं. मी नाखुशीनेच त्याला ' ठीक आहे' छापाचं उत्तर दिलं आणि ' गेला उडत' असा मनोमन म्हणत बाकीच्यांबरोबर दिवस साजरा केला.
संध्याकाळी खाली उतरल्यावर गाडीत बसताना मागून मला याचा आवाज ऐकू आला " थांब....मला बोलायचंय "
'फादी? केक संपला केव्हाच....'
' नाही, त्यासाठी नाही. तुला गैरसमज नको म्हणून सांगतोय, माझ्या धर्मात वाढदिवस आणि केक या गोष्टींना महत्व नाही, म्हणून मी माझ्या घरी सुद्धा हे सगळं करत नाही. माझी ४ मुलं कधीही वाढदिवस साजरा करत नाहीत, केक कापत नाहीत आणि मेणबत्त्या फुंकून विझवत नाहीत. हे सगळे पाश्चात्य चाळे माझ्या धर्माला मान्य नाहीत.'
' अरे, ऑफिस मधले कितीतरी लोक जे अरब आहेत, तुझ्याच धर्माचे आहेत आणि रोज पाच वेळा न चुकता नमाज पढनारे आहेत, ते सुद्धा इतके ताठर नाही वागत रे....पण मी सगळ्या धर्मांचा आणि त्या धर्मांमध्ये दिल्या गेलेल्या शिकवणुकीचा मनापासून सन्मान करतो। तुला तुझ्या धर्माचं पालन तुला योग्य वाटेल तसं करता आलाच पाहिजे.....मी तुला कधीच जबरदस्ती नाही करणार। मला खरंच वाईट नाही वाटलं. '
माझ्या या उत्तराने तो थोडा सुखावला। हसून ' thank you ' म्हणत आपल्या वाटेल निघाला. ऑफिस मध्ये हा घुम्या, एकलकोंडा, कामाव्यतिरिक्त एकही अक्षर न बोलणारा आणि स्वतःचं खाजगी आयुष्य कायम जगापासून लपवून ठेवणारा म्हणून का प्रसिद्ध आहे हे मला आज कळलेलं होतं. ऑफिस मधले काही लोक तर त्याला खाजगीत काहीही बोलायचे. एकूणच काय, सगळ्यांचा नावडता आणि एकंदरीत माणूसघाणा असा हा प्राणी आमच्या ऑफिसमध्ये काहीसा विजोड वाटायचा.
एका कामानिमित्त फादी माझ्या 'टीम' मध्ये सामील झाला. बाकी कसाही असला तरीही कामाला चोख असल्यामुळे मला त्याच्याबरोबर काम करताना काहीही अडचण आली नाही. त्याचे कामाच्या बाबतीतले नियम पक्के होते। दिवसाच्या सुरुवातीला १० मिनिटं तो दिवसभराच्या कामाचा आराखडा आखून घ्यायचा. त्यानंतर पुढच्या अर्ध्या तासात बाकीच्या लोकांना कामं नेमून द्यायचा. मग जेवणाच्या वेळेपर्यंत आपली कामं मन लावून करायचा। मध्ये मी त्याला कधीही कॉफी प्यायला, धूम्रपान करायला किंवा नुसत्याच टिवल्या बावल्या करायला उठलेलं पाहिलं नाही. उठायचा तो फक्त नमाजाची वेळ झाली की. तो त्याने कधीही चुकवला नाही। दुपारनंतर कामाचा आढावा , मीटिंग, क्लायंटला पाठवायचे इ-मेल, फोनेवरची संभाषणं या सगळ्या गोष्टी व्हायच्या आणि जायच्या आधी दुसऱ्या दिवशीच्या कामांची यादी टेबलवर ठेवून तो निघायचा. हातात जपमाळ सतत असायची. या माणसाला बोलता कसा करायचा, हे माझ्यापुढचं आव्हान होतं, कारण बाकीचे लोक ' हा कंटाळवाणा माणूस नको आपल्यात' अशा पद्धतीची तक्रारवजा विनंती नेहेमी करायचे.
एके दिवशी आम्ही दोघे क्लायंटकडे निघालेलो असताना एका विचित्र प्रसंगाला आम्हाला तोंड द्यावं लागलं. काहीशा वेगात जात असलेल्या एका गाडीने आमच्या गाडीला बाजूने धडक मारली. दुबईला अशा वेळी पोलीस बोलावून पंचनामा करणं बंधनकारक आहे. त्याप्रमाणे पोलीस आल्यावर त्याने नेहेमीप्रमाणे त्या दुसऱ्या गाडीच्या चालकाला आणि मला अपघातासंबंधी प्रश्न विचारले. त्या गाडीच्या चालकाने अरबी भाषेत चूक माझी आहे आणि मी गाडी धडकावली अशी खोटी थाप ठोकून दिली. मला अरबी भाषा येत नसल्यामुळे मला तो प्रकार कळलं नाही आणि अचानक आत्तापर्यंत शांत असलेला फादी आपणहून समोर आला. त्याने पोलिसाला सगळ्या प्रसंगाचा नीट वर्णन करून तो खोटारडेपणा उघडकीस आणला आणि त्या खोटारड्या मनुष्याला ' लाज बाळग, अल्लाह माफ करेल का तुला यासाठी?' अशा शब्दात त्याने दटावलं। सगळे सोपस्कर होऊन आम्ही पुन्हा आमच्या वाटेवर निघालो आणि मी फादीला मनापासून धन्यवाद दिले.
' अरे त्यात काय.....तो खोटं कसं काय बोलू शकतो? अल्लाहची पण त्याला भीती नाही वाटत?' फादी जरा बोलता झाला.
' सोड ना.....त्याची पापं तो बघून घेईल'
' ते तर झालंच....'
' पण तू खरंच खूप मदत केलीस....नाहीतर मलाच दंड भरावा लागलं असता'
' नाही.....नक्कीच नाही. आणि तू भरला असतास तर त्याच्या दुप्पट पैसे तुला अल्लाहने दिले असते आणि त्या खोटारड्याकडून दसपट पैसे अल्लाहने घेतले असते. तुझी चूक नसेल तर अल्लाह तुला काहीही त्रास होऊ देणारं नाही'
धर्माच्या बाबतीत काटेकोर असला तरी फादी खरा होता आणि इतरांच्या धर्माचा सन्मान करणारा होता हे या निमित्ताने मला समजला आणि मला मनापासून आनंद झाला. आता याला थोडा अजून बोलता करूया असा विचार करून मी मुद्दाम त्याला संभाषणात गुंतवायचं ठरवलं.
' मला थोडा सांग न तुझ्याबद्दल....अर्थात तुझ्या मनाविरुद्ध नाही......तुला वाटलं तर सांग.....'
' ठीक आहे....काय सांगू? मला माहित आहे कि मी फारसा कोणाला आवडत नाही...लोकांना मी कंटाळवाणा माणूस वाटतो पण काय करू? मी ज्या वातावरणात वाढलो, त्याचं परिणाम आहे हा....कदाचित माझं मूळ स्वभावच थोडा एकलकोंडा असेल....जे पण कारण असेल,, इतका नक्की कि मी काही कोणाला मित्र म्हणून जवळचा वाटायच्या लायकीचा नाहीये.'
' अरे असा का म्हणतोस? तो तुझा स्वभाव आहे.....मला तू मित्र म्हणून आवडतोस'
' खरं? ' ' नक्कीच.....तुझे चांगले गुण कितीतरी आहेत.....कामात तू चोख आहेस, विश्वासू आहेस, कोणाचा नवा पैसे तू कधी ठेवलेला मी बघितलेला नाहीये, ऑफिसमध्ये तू एकटा असा आहेस जो स्वतःची कॉफी स्वतः विकत घेतोस, बनवतोस आणि कप सुद्धा विसळून ठेवतोस.....किती लोक हे करतात? मला सुद्धा नाही सुचत हे सगळं......'
' कारण मला काहीही करताना मनात एकमेव विचार हा येतो, कि अल्लाह माझ्याजकडे बघतोय....मी हि कृती केली तर त्याला काय वाटेल.....म्हणून मग माझ्याकडून काहीही वाईट गोष्ट न घडण्याच्या दृष्टीने मी जे जे शल्य होईल ते ते स्वतः करतो. '
' तुझा देश, तुझं कुटुंब याबद्दल सांग न थोडंसं....'
' मी सौदी अरेबियाचा नागरिक.रियाधहून पदवी घेऊन पुढे जर्मनीला पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि काम करायला इथे आलो।माझ्या घरी माझ्या वडिलांनी तीन लग्न केली, त्यामुळे घरात आम्हा सक्ख्या आणि सावत्र भावंडांमध्ये सतत असूया , वाद, बखेडे होत होते.....मला ते सगळं नकोच आहे.....त्यामुळे एकच लग्न केलं मी आणि आता ४ मुलांचा बाप आहे मी. माझ्या बायकोला मी लग्नानंतर पदवीचा शिक्षण पूर्ण करायला लावलं. माझ्या दोन मुलींना सुद्धा माझ्या मुलांसारखंच शिकवणार आहे मी .'
काही बाबतीत अतिशय कट्टर आणि काही बाबतीत आधुनिक असं हे काहीतरी विचित्र रसायन होतं. जो माणूस केक घ्यायला आणि वाढदिवस साजरा करायला इतका नकार देतो, त्याचा मुलीकडे आणि स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन इतका पुढारलेला आहे हे माझ्यासाठी नवल होतं.
' आमच्या देशात अमेरिकेने पाय ठेवला आणि आमची सगळी रयाच गेली. राजे फैसल होते, तेव्हा त्यांनी या पाश्चात्य देशांना मस्त धडा शिकवला होता. अमेरिका पेट्रोलसाठी रडत आलेली आमच्या दाराशी....पण नंतर सगळं बदललं. तुला माहित आहे का, माझ्या वडिलांचा स्वतःचं विमान आहे. मला नोकरी करायची गरज नाहीये पण वडिलांचा पैसा उडवून जगलो तर अल्लाह काय म्हणेल.....म्हणून मी स्वतः मेहेनत करतो आणि माझ्या मेहेनतीचाच खातो.'
माझं कानांवर विश्वास बसेना. हा माणूस मनात आणलं तर आमच्या ऑफिसला विकत घेईल! इतकी श्रीमंती याच्याकडे आहे, पण तरीही हा स्वाभिमानाने जगतोय हे माझ्यासाठी धक्कादायक होतं.
हळूहळू पुढच्या काही दिवसात याच्याबरोबर जमेल तसं मी बोलत गेलो. काहीसा मनस्वी असलेला हा प्राणी कधी कधी एकदम चिडीचूप असायचा आणि कधी कधी अगदी हळू आवाजात पण बोलायचा. त्यातूनच याच्या आयुष्याचे काही विलक्षण पदर उकलले गेले आणि मला त्याच्याबद्दल प्रचंड आदर वाटायला लागला. कोट्याधीश असलेल्या या मनुष्याने पन्नास लाख रियालची भक्कम देणगी मक्केमध्ये एक सुंदर धर्मशाळा उभारण्यासाठी दिली होती. गरीब यात्रेकरूंना तो तिथे मोफत राहू आणि खाऊ-पिऊ द्यायचा. वेळप्रसंगी कैकांना त्याने या न त्या रूपाने अनेक गोष्टींसाठी सढळ हाताने मदत केली होती. मोबदल्यात एका पैची अपेक्षा न ठेवता त्याने अनेक मुलांची शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती.
' अरे, पण कोणी तुला फसवून तुझ्याकडून पैसे घेतले तर तुला कसं कळणार?'
' माझं काम आहे मदत करणं. मी पैसे दिले, अल्लाहने मला नेमून दिलेलं काम मी मनापासून केलं. त्याने मला फसवलं तर जेव्हा कयामत होईल आणि तो आणि अल्लाह समोर येतील तेव्हा त्याला त्याच्या कर्मांची सजा मिळेल.' इतक्या स्पष्टपणे आणि स्वच्छपणे काम करणारा हा माणूस इतकं तितकं काम करून त्याचे जगभर ढोल बडवणाऱ्या अनेकांपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ होता.
धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या हिंसेला त्याचं मनापासून विरोध होता. ' सच्च मुसलमान तो, त्याच्या आजूबाजूच्या हजार घरांना तो असल्यामुळे सुरक्षित वाटेल......आणि त्यांच्या सुरक्षेसाठी सगळ्यात आधी माझं जीव मी धोक्यात घालेन' हे त्याचं तत्व माझ्या मते धर्मांधळ्या लोकांसाठी - मग ते कोणत्याही धर्माचे का असोत - डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं आहे. आपल्या धार्मिक आचार-विचारांना जीवापाड जपणारा हा फादी इतरांच्या धार्मिक बाबतीत कधीही ढवळाढवळ करत नसे. त्याला इतरांच्या त्याच स्वातंत्र्याचा मनापासून आदर होता. रमझान महिन्यात तो अतिशय काटेकोरपणे रोझे पाळायचा, पण सूर्यास्तानंतर जेवण करताना कधीही एकटा आपल्या घरच्यांबरोबर जेवायचं नाही। त्या महिन्यात घराजवळच्या मशिदीत त्याच्या घरून कमीत कमी पन्नास माणसांना पुरेल इतकं जेवण रोज न चुकता जायचं.
दर वर्षी न चुकता तो मक्केच्या त्या आपल्या धर्मशाळेला भेट द्यायचा, सगळ्या गोष्टी नीट आहेत कि नाही याची खातरजमा आपल्या बाजूने करायचा आणि काही नव्या गोष्टींची भर घालून असलेल्या सुविधा अधिकाधिक चांगल्या होतील याची खबरदारी घ्यायचा. मनात राग असेल म्हणून कदाचित, पण जगभर फिरूनही कधी अमेरिकेला आणि इंग्लंडला गेला नाही. त्याच्या मते या दोन देशांनी अक्ख्या जगाची वाट लावली आणि म्हणून त्या देशांमध्ये जाणं त्याच्या मनाला कधीच पटलं नाही. आपल्या वडिलांच्या शस्त्रक्रियेनिमित्त भारतात गेला होता आणि तेव्हा त्याने काहीशा अशांत वातावरणातही काश्मीरच्या हजरतबलला जाणून प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या पवित्र केसाचं दर्शन घेतलं होतं. पुन्हा एकदा भारतात जायचंय आणि अजमेर शरीफच्या दर्ग्याला भेट घ्यायचीय असा त्याने एकदा मला सांगितलं होतं.
एके दिवशी आमच्या ऑफिसने त्याची बदली शारजा ऑफिसमधून थेट बाहरेनला केल्याची बातमी आली. यूएई मधलं आपलं २० वर्षाचा वास्तव्य संपवून तो नव्या जागी निघाला.जाताना अर्थात सगळ्यांना भेटायचे सोपस्कर त्याने पार पडले आणि मला पाच मिनिटं खाली येऊन भेटायला सांगितलं. मी गेलो, तेव्हा त्याने आपल्या खिशातून एक छोटी काचेची बाटली काढून माझ्या हातात दिली. ' मक्केच्या झमझम विहिरीचा पाणी आहे. घरात ठेव, कोणत्याही वाईट शक्ती कधीच तुझा काही वाकड नाही करू शकणार' तो बोलला.
' एका अटीवर, यापुढे माझ्या वाढदिवसाचा केक घ्यायचा.' मी हसत हसत त्याला सांगितलं. एक क्षण विचार करून त्याने स्मितहास्य केलं आणि म्हणाला, ' सगळ्यांसमोर नाही घेणार.....गपचूप घेईन....तुझ्याकडून घ्यायला हरकत नाही....' त्या क्षणी माझ्यासाठी मक्केचा तो नेक बंदा खर्या अर्थाने माझा मित्र झाला !

Comments
Post a Comment