Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020

शापित यक्ष

चित्रपटात, नाटक आणि दूरचित्रवाणी ही माध्यमं आवडत नसलेला मनुष्यप्राणी सापडणं आजच्या जगात मिळणं जवळ जवळ अशक्यप्राय आहे. मागच्या चाळीस-पन्नास वर्षात या क्षेत्रात झालेल्या जबरदस्त प्रगतीमुळे आज लहान मुळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येक जण या दृक्श्राव्य माध्यमाशी जवळ जवळ व्यसनाधीन झाल्यासारखा जोडला गेलेला आहे. आजच्या 'डिजिटल' युगात आंतरजालाच्या पायावर उभी राहिलेली OTT platforms या सगळ्यात अजून भर घालत आहेत. या माध्यमाशी व्यवसायानिमित्त थेट जोडला गेलेला आणि अल्पावधीत काहीतरी भव्यदिव्य करून दाखवायच्या धाडसामुळे आयुष्याची राखरांगोळी करून घेतलेला फराझ माझ्या आयुष्यात काही क्षणच आला, पण त्याच्याबरोबर घालवलेल्या क्षणांनी मला जे जे काही दिलं, त्याबद्दल आजन्म मी त्याच्या ऋणात बांधला गेलो.  फराझ हा मनुष्य काश्मिरी. भारत आणि पाकिस्तान ( आणि या दोन्ही देशांच्या कर्मकरंटेपणामुळे हळूच आत शिरून नंतर ऐसपैस पाय पसरलेला महाधूर्त चीन ) यांच्यात वर्षानुवर्ष सुरु असलेला जीवघेणा संघर्ष ज्या नंदांवनाचं महाभारतानंतरच्या भयाण कुरुक्षेत्रात रूपांतर करून गेला, त्या भूमीतल्या एका मूळच्या सुखवस्तू काश्मि

स्वच्छंदी

' आपल्या मर्जीचा मालक ' हे विशेषण बरेच वेळा बिनधास्त, बेलगाम जगणाऱ्या व्यक्तींना आपण सर्रास चिकटवत असतो. कोणाचाही मुलाहिजा नं बाळगणारे, जबाबदाऱ्यांचा फारसा विचार नं करणारे ,सहसा लग्नाच्या बंधनात नं अडकणारे आणि अडकलेच तर मुलं जन्माला घालून आपल्या 'स्वातंत्र्यावर' गदा आणू नं देणारे असे महाभाग आपल्याला अनेकदा आजूबाजूला दिसत असतात. युरोपमधल्या भटक्या हिप्पी जमातीच्या आत्म्यांचा जणू पुनर्जन्म झालेला आहे, अशा थाटातलं त्यांचं वागणं नाकासमोर बघून जगणाऱ्या लोकांसाठी 'अब्रमण्यम' असतं. अशाच एका मुलखावेगळ्या मनुष्याची माझ्या नव्या ऑफिसमध्ये गाठ पडली आणि सुरुवातीला काहीसा त्रासदायक वाटलेला हा अतरंगी प्राणी हळू हळू माझा चांगला दोस्त झाला.  पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या मला रिसेप्शनिस्टने ' ओरिएंटेशन' साठी मीटिंग रूम मध्ये बसायला सांगितलं आणि मदतनीसाला माझ्यासाठी कॉफी तयार करायला सांगितली. ही रिसेप्शनिस्ट माझ्या आधीच्या ऑफिसच्या रिसेप्शनिस्टप्रमाणे नाजूक, गोड आवाजाची वगैरे औषधालाही नव्हती. तिचा आवाज आयुष्यात पहिल्यांदा जो क्लायंट ऐकेल, तो आपण चुकून पोलीस

जपानी वामन

" मॅन, वॉन्ट तवू काम फो फीशींग?" आपल्या जपानी हेल असलेल्या इंग्रजीत हिराकू मला आग्रह करत होता. माझ्या दुबईतल्या सुरुवातीच्या ' स्ट्रगल ' च्या दिवसात एका खोलीत तीन डोकी अशा पद्धतीने राहत असल्यामुळे अनेकदा तऱ्हेतऱ्हेचे लोक माझे रूममेट म्हणून माझ्याबरोबर राहिले आहेत, त्यातला हिराकू हा एक विक्षिप्त प्राणी. समुद्र, मासे, वाळू, जहाज आणि भटकंती या विश्वात सतत रममाण असणारा आणि दुबईला दर शनिवारी विशेष परवाना घेऊन खोल समुद्रात मासेमारी करायला जाणारा हा माझा 'रूममेट' लाघवी स्वभावाचा असला, तरी पंचेचाळीस डिग्रीच्या उष्णतेत मासेमारीला जायच्या जीवघेण्या साहसाची मला तरी भीती वाटत होती. कसाबसा त्याला त्याच्या मार्गावर पिटाळून मी घरात परतलो आणि पंख्याच्या समोर बसून घाम टिपला. हा हिराकू म्हणजे एक वल्ली होता. एका संध्याकाळी मी रूमवर परतलो, तेव्हा मला एक भली मोठी 'बॅगसॅक ' बाजूच्या बेडवर पडलेली दिसली. बेडच्या खाली सपाता, दुर्बीण, व्यावसायिक छायाचित्रण करायला वापरतात तसा कॅमेरा आणि लेन्सेस,रेखाटन करायचं साहित्य अशा एक ना अनेक गोष्टी ठेवलेल्या दिसल्या. हा कोण नवा प्राणी आप