Skip to main content

Posts

Showing posts from June, 2020

कुकरी बहादूर

दुबईच्या माझ्या वास्तव्यात मी काम केलेल्या जवळपास सगळ्या ऑफिसमध्ये मला असंख्य वल्ली भेटलेले आहेत. वेगवेगळ्या देशाचे, जातीचे, धर्माचे आणि वंशाचे लोक या अनोख्या देशात कामाच्या निमित्ताने आलेले असल्यामुळे हा देश एका अर्थाने 'सर्वसमावेशक' देश बनलेला आहे. इथे सगळेच जण या ना त्या रूपाने 'एकाच उपऱ्या जातीचे' असल्यामुळे अनौपचारिकतेच्या सगळ्या भिंती हळू हळू गळून जाऊन एकमेकांशी संवाद सुरु व्हायला विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. माझ्या पहिल्यावहिल्या ऑफिसमध्येही अशा सगळ्या वातावरणात आठवड्याभरातच मी बऱ्यापैकी रुळल्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा घरापासून दूर देशात एकटा राहायची माझी पहिली वेळ माझ्यासाठी विशेष तापदायक ठरली नाही.  ऑफिसमध्ये माझ्या सहकाऱ्यांपेक्षा आधी परिचय झालेला ' रेशम ' हा आमच्या ऑफिसचा ' टी बॉय '. नेपाळमधल्या पोखरा शहरातून चार-पाच वर्षांपूर्वी दुबईला आमच्या ऑफिसमध्ये आलेला हा मनुष्य अतिशय चुळबुळ्या आणि बडबड्या होता. सुरुवातीला नावामुळे मला 'मादी' वाटलेला हा 'नर' खरं तर 'नरपुंगव' सदरात मोडणारा होता. अंगापिंडाने मजबूत आणि काटक असलेल