Skip to main content

Posts

Showing posts from March, 2020

सूर निरागस हो

संगीताची आवड असलेला माणूस बरेच वेळा स्वतःला गाता गळा नसला तरी संगीताचा 'कान' असल्यामुळे सतत चांगल्या गायकांच्या आणि गाण्यांच्या संगतीत असतो. माझ्यासारख्या संगीत वेड्याला कुठेही गेलं तरी चांगलं संगीत कानावर पडल्यावरच खऱ्या अर्थाने त्या जागेशी नाळ जुळल्यासारखी वाटते. त्या संगीताला भौगोलिक अथवा व्याकरणात्मक बंधन नसतं. अरबी संगीतकारांच्या रबाबात अथवा मिझमारमध्ये उमटणारे सूर खरे असले, तर त्याची अनुभूती घ्यायला आपल्याला आपण अरबी नसल्याची अडचण भासत नाही. सिंगापूरमध्ये कोलिनटॉन्ग ऐकताना किंवा चीनमध्ये डिझीवर वाजवले जाणारे संथ सूर ऐकताना तंद्री लागतेच लागते. एका आफ्रिकेच्या 'ग्रुप' चा जेमबे आणि रॅटल्सच्या जुगलबंदीचा श्रोता होताना आपण आफ्रिकेत कधीही न गेल्याचा 'परकेपणा' जराही जाणवत नाही. याच वेडामुळे असेल, पण दुबईला आल्यावर माझ्या ओळखीतल्या एका मित्राच्या 'गायनाच्या' वर्गात मी पेटीवर सूर धरण्यासारखी छोटी छोटी कामं करायच्या निमित्ताने गेलो आणि तिथला एक श्रोता होऊन माझी 'ऐकण्याची' हौस भागवायला लागलो. त्या वर्गाचे शिक्षक कर्नाटकी संगीताचे जाणकार असल्यामुळे

ती ' राजहंस ' एक

सौंदर्य,लावण्य, देखणेपणा, रेखीवपणा अशा सगळ्या मोजमापांना मागच्या काही वर्षात 'आंतरराष्ट्रीय' वलय प्राप्त झालं आहे. सौंदर्यस्पर्धा, शरीराची प्रमाणबद्धता मोजण्याचे निकष, गोऱ्या कांतीला सावळ्या अथवा काळ्या कांतीपेक्षा मिळालेली सर्वमान्यता, सौंदर्य प्रसाधनांच्या मोठमोठाल्या कंपन्यांनी आणि 'फॅशन इंडस्ट्री'ने लोकांच्या मानसिकतेवर जाहिरातींचा मारा करून टाकलेला प्रभाव अशा अनेक मार्गांनी सौंदर्याच्या व्याख्या आमूलाग्र बदलल्या गेल्या आहेत. या सगळ्या धोपट मार्गाच्या विरुद्ध जाऊन स्वतःच्या मनाप्रमाणे याच 'फॅशन इंडस्ट्री'मध्ये स्वतःचं नाव कमावणारी दीमा मला काही दिवसांपुरतीच भेटली, पण तिच्यातल्या त्या जबरदस्त बंडखोरीमुळे आणि कोणत्याही व्यक्तीला थेट भिडायच्या धडाडीमुळे माझ्यावर तिने चांगलाच प्रभाव टाकला. एका ऑफिसच्या अंतर्गत सजावटीचं काम आमच्याकडे आलं. आमच्या पहिल्या क्लायंट मीटिंगच्या वेळी आम्हाला ऑफिसमध्ये हव्या असलेल्या सोयी आणि आवश्यक गोष्टींची यादी आम्हाला देण्याचं काम दीमाकडे होतं. दीमा माझ्याबरोबर संभाषण करायला बसली, तेव्हा तिच्या व्यक्तिमत्वाने पहिल्या काही मिनिटात म

वाल्मिकी

आफ्रिकेच्या देशांमधला त्यातल्या त्यात प्रबळ, लोकसंख्येने समृद्ध आणि अर्थकारणाच्या बाबतीत आजूबाजूच्या भावंडांपेक्षा उजवा असेलला देश म्हणजे नायजेरिया. या देशाच्या जमेच्या बाजूमध्ये अनेक गोष्टी लिहिता येऊ शकतात हे खरं असलं, तरी त्यापेक्षा कैक पटीने अधिक गोष्टी विरुद्धच्या रकान्यात भरता येऊ शकतात. या देशाच्या तरुणांची संख्या एकूण लोकसंख्येच्या पन्नास टक्क्यांहून जास्त असल्यामुळे रूढार्थाने हा देश प्रगतीच्या शिखरावर असणं जरी अपेक्षित असलं, तरी भ्रष्टाचार, देशांतर्गत हिंसाचार, संघटित गुन्हेगारी यामुळे या तरुणांचा ओढा नको त्या दिशेला जास्त आहे. जगभरात अनेक देशांमध्ये नायजेरिअन तरुण-तरुणींना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून शिक्षा होणं हि रोजची बातमी झालेली आहे. 'अलाके ' असं साधारण भारतीय माणसाला उमजायला कठीण पद्धतीचं नाव असलेला, सव्वासहा फूट उंच, अंगापिंडाने मजबूत, पिवळसर पांढऱ्या बटबटीत डोळ्यांचा आणि घोगऱ्या आवाजात आफ्रिकन शैलीत इंग्रजी बोलणारा हा माणूस मला माझ्या एका प्रोजेक्टचं काम करत असताना भेटला. अबू धाबी इथल्या कोर्टाचं नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्याचा काम आमच्या ऑफिसला मि

एक आदर्श 'रुग्ण'

" हॅलो, आशिष का? अरे एक वाईट खबर द्यायचीय...आपला सूरज गेला...." रात्री दहा वाजता झोपायच्या तयारीत असताना मला माझ्या मित्राचा फॉरेन आला आणि मी अंतर्बाहय हादरलो. सूरज आपल्यात नाही हे सत्य पचवणं जड होतंच...अगदी मागच्या काही वर्षांपासून असं काहीतरी होणार आहे हे माहित असून सुद्धा. सूरज हा माझा जीवश्च कंठश्च नसला, तरी जवळचा मित्र नक्कीच होता. किंबहुना तो जगमित्र होता...मीच काय, जगातल्या कोणाशीही तो इतकी सहज मैत्री करू शकायचा, की त्याच्यात एक अदृश्य चुंबकीय शक्ती असून ती मनुष्यांना आपल्याकडे आकर्षित करते अशी सतत शंका यायची. अगदी माणूसघाण्या आणि खडूस लोकांनाही सूरज सहज आपलासा करून घ्यायचा. त्याची आणि माझी ओळख झाली एका विमानप्रवासात. मुंबई ते दुबई प्रवासात फक्त तीन तासात माझ्या बाजूला बसलेल्या या माणसाने अनोळखी ते ओळखीचा ते मित्र अशा शिड्या भरभर चढून मला खिशात टाकलं होतं. त्याची मैत्री करायची एक खास पद्धत होती. आधी तो स्वतःची जुजबी ओळख करून द्यायचा. त्यानंतर समोरच्याला नाव-गाव वगैरे परवलीचे प्रश्न विचारल्यावर थेट त्याच्या आवडी-निवडींवर यायचा. स्वतःकडे अनुभवांची आणि किश्श्यांची भली

लग्नाळू

मी लहान होतो, तेव्हा माझ्या ज्या ज्या नातेवाईकांची लग्न मी पहिली आहेत, त्यांच्या अनेक सुंदर आठवणी आजही माझ्या मनाच्या एका खास कप्प्यात मी जपून ठेवलेल्या आहेत. मुळात तीस-पस्तीस वर्षांपूर्वी नात्यातल्या लोकांचं एकमेकांकडचं जाणं-येणं, सुट्टीच्या दिवसात महिना-महिनाभर मुक्कामाला येणं किंवा सणासुदीला आवर्जून घरी जाऊन एकत्र फराळ करणं हा सवयीचा भाग होता. घरात लग्नकार्य असेल तर नातेवाईक दोन-दोन आठवडे लग्नघरात तळ ठोकायचे आणि आपापला हातभार लावून ते कार्य निर्विघ्न पार पाडायला मदत करायचे. आज काळानुसार लग्न, लग्नाच्या पद्धती, जागा आणि एकंदरीतच सगळा जामानिमा पूर्णपणे बदलून गेलेला आहे. आज लग्नाकडे एक सोहळा म्हणून ना बघता ' इव्हेंट' म्हणून बघण्याची प्रथा पडलेली आहे आणि म्हणूनच अशा 'इवेन्ट'ना पार पडायची जबाबदारी घेणारे 'मॅनेजर' आणि त्यांच्या ' मॅनेजमेंट कंपन्या' यांना सुगीचे दिवस आलेले आहेत. लग्नाच्या अथपासून इतिपर्यंत सगळ्या गोष्टी ते बघणार, लग्नकार्य रंजक व्हावं म्हणून आधीपासून लग्नाचं 'प्लांनिंग' करणार आणि त्याचे चोख दाम वसूल करणार हे माहित असूनही आज 'लो

शंकराचा नंदी

काही माणसं कुंडलीत ' आजन्म लाळघोटेपणा ' नावाचा एक महत्वाचा योग्य घेऊनच जन्माला येतात. त्यांचे बाकीचे ग्रह त्या एका योगाभोवती पिंगा घालत असतात .साडेसाती असो व मंगळ, हा योग्य त्यांना सगळ्या कुग्रहांपासून सतत दूर ठेवतो. सहसा एका ठिकाणी कामाच्या निमित्ताने चिकटल्यावर अशी माणसं आजन्म तिथेच राहतात, किंवा ज्यांचे ' लोम्बते ' होऊन ते तिथे टिकलेले असतात, त्यांनी नोकरी बदलल्यावर मागोमाग त्यांच्याबरोबर हे सुद्धा नव्या जागी दाखल होतात. अशा माणसांना स्वत्व, स्वाभिमान, स्वतंत्र अस्तित्व अशा कोणत्याही गोष्टींची गरज कधीच पडत नाही. माझ्या ऑफिसमध्ये रुजू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी काही कारणाने आमच्या डायरेक्टरकडे काही कामानिमित्त मी गेलो आणि केबिनच्या बाहेर मला आसिफ भेटला. हा माणूस हातात कोणत्या तरी प्रोजेक्टचे कागद घेऊन कॅबिनमध्ये जायची वाट बघत उभा होता. घरून निघताना बहुधा अजूनही याची आई याची तयारी करून देत असावी असं विचार माझ्या मनाला चाटून गेला, कारण या महाभागाचा अवतार जरा जास्तच नीटनेटका होता. तेल लावून नीट विंचरलेले पातळ केस, तुळतुळीत केलेली दाढी, पांढरा शर्ट, काळी पॅन्ट, काळ्या रंग

धर्मवेडा नास्तिक

धर्म हा विषय म्हणावा तर जिव्हाळ्याचा आणि म्हणावा तर त्रासाचा. वेगवेगळ्या लोकांचा धर्माविषयीचा दृष्टिकोन त्यांच्या कुटुंबाच्या आणि आजूबाजूच्या परिस्थितीच्या अनुषंगाने तयार होत असतो. पुढे जगाचा अनुभव घेऊन त्यांच्या त्या दृष्टिकोनात एक तर नव्या ज्ञानाची भर पडते अथवा धर्माविषयी अनास्था तयार होते. खऱ्या अर्थाने एक अतिशय संवेदनशील आणि नाजूक असा हा विषय एखाद्या व्यक्तीबरोबर तासनतास पिंजून काढता येईल, असा मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. किंबहुना धर्म हा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक आयुष्यापर्यंत मर्यादित ठेवायलाच विषय आहे, असं माझं प्रामाणिक मत असल्यामुळे स्वतःहून या विषयाला मी सहसा चारचौघात हात घालत नाही, पण ' कबीर' भेटल्यावर मात्र माझ्या या सगळ्या निर्बंधांना मी त्याच्याशी संभाषण करताना ठरवून तिलांजली द्यायला लागलो. हा माणूस मला भेटला तो एका विशिष्ट कामानिमित्त. मी कामानिमित्त सिंगापूरला गेलो होतो, तेव्हा चांगी विमानतळावर 'पासपोर्ट कंट्रोल' च्या रांगेत हा माझ्यापुढे उभा होता. पासपोर्ट चेक होऊन आम्ही पुढे गेलो, तेव्हा चालताना त्याच्या कोटाच्या खिशातून त्याच्या नकळत त्याचं पा

गुणा

मलेशिया हा देश बघायचा योग्य आयुष्यात कधी ना कधी यावा, अशी माझी मनापासून इच्छा होती. या देशाबद्दल मी बरंच काही ऐकलं होतं, पण माझ्यासाठी या देशाची महत्वाची ओळख म्हणजे या देशाच्या राजधानीत क्वालालंपूरला जगातल्या सर्वात उंच इमारतींमधली एक असलेली पेट्रोनॉस टॉवर ही इमारत. खरं तर या जुळ्या इमारती आहेत, ज्या एकमेकांशी 'skybridge' ने  जोडलेल्या आहेत.वास्तुविशारद असल्यामुळे अशा जागा माझ्यासाठी तीर्थस्थळांसारख्या, परंतु बरोबर मुलगी आणि बायको असल्यामुळे माझ्यातल्या वास्तुविशारदाला मला काबूत ठेवणं भाग होतं. शेवटी क्वालालंपूरमधल्या खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या जागा, आजूबाजूच्या पर्यटकांसाठीच्या महत्वाच्या जागा आणि प्राणीसंग्रहालय, फुलपाखरांची बाग अशा मुलीला आवडतील अश्या जागा दोन दिवस बघायच्या आणि तिसऱ्या दिवशी दुपारचे काही तास मला ते टॉवर बघायची मुभा द्यायची अशा पद्धतीचा 'सौदा' तुटला. क्वालालंपूर ही जागा बघायला एखादी गाडी आणि त्याबरोबर एखादा माहितगार माणूस मिळावा म्हणून आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो तिथे चौकशी केली आणि थोड्या खटपटीनंतर आम्हाला एक माणूस मिळाला. दुसऱ्या दिवशी सकाळी

बंडखोर

समाजातल्या अनेक रूढी, परंपरा आणि प्रथा वर्षानुवर्षे चालत आल्यामुळे त्यांना एक प्रकारचं अमरत्व प्राप्त झालेलं असतं. काल बदलतो, वेळ बदलते पण माणसांच्या मनात त्यांचं स्थान अबाधित राहतं. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सगळ्या रूढी-परंपरांचं ओझं हस्तांतरित होत असतं. त्या रूढी-परंपरांचा मूळ उद्देश मधल्या मध्ये एक तर अर्धवट हस्तांतरित होतो किंवा पूर्णपणे विस्मृतीत जातो आणि एखाद्या पिढीत निपजलेला एखादा बंडखोर त्या सगळ्याला तर्कांच्या आधारावर आव्हान देतो. हा तर्कवादी दृष्टिकोन अनेकांच्या पचनी पडत नाही. पोथीनिष्ठ विचारांचा बुद्धिनिष्ठ विचारांशी मग झगडा सुरु होतो आणि त्यातून अनेकदा संघर्षाची स्थिती उत्पन्न होते. श्रीराम असं भारतातल्या एका देवतुल्य व्यक्तिमत्वाचं नाव धारण केलेला, वाराणसीसारख्या देवाधर्माचा अतिशय अभिमान असलेल्या शहरातल्या एका ऋग्वेदी ब्राह्मण कुळात जन्माला आलेला आणि लहानपणापासून पूजाअर्चा , सोवळं-ओवळं आणि परंपरांना जीवापाड जपणाऱ्या एका कर्मठ कुटुंबात मोठा झालेला हा वल्ली मला मुंबईमध्ये लोकल ट्रेनमधून प्रवास करताना भेटला. दररोज लाखो लोकांना एकीकडून दुसरीकडे नेणारा मुंबईच्या लोकल ट्रे