चित्रपटात, नाटक आणि दूरचित्रवाणी ही माध्यमं आवडत नसलेला मनुष्यप्राणी सापडणं आजच्या जगात मिळणं जवळ जवळ अशक्यप्राय आहे. मागच्या चाळीस-पन्नास वर्षात या क्षेत्रात झालेल्या जबरदस्त प्रगतीमुळे आज लहान मुळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येक जण या दृक्श्राव्य माध्यमाशी जवळ जवळ व्यसनाधीन झाल्यासारखा जोडला गेलेला आहे. आजच्या 'डिजिटल' युगात आंतरजालाच्या पायावर उभी राहिलेली OTT platforms या सगळ्यात अजून भर घालत आहेत. या माध्यमाशी व्यवसायानिमित्त थेट जोडला गेलेला आणि अल्पावधीत काहीतरी भव्यदिव्य करून दाखवायच्या धाडसामुळे आयुष्याची राखरांगोळी करून घेतलेला फराझ माझ्या आयुष्यात काही क्षणच आला, पण त्याच्याबरोबर घालवलेल्या क्षणांनी मला जे जे काही दिलं, त्याबद्दल आजन्म मी त्याच्या ऋणात बांधला गेलो. फराझ हा मनुष्य काश्मिरी. भारत आणि पाकिस्तान ( आणि या दोन्ही देशांच्या कर्मकरंटेपणामुळे हळूच आत शिरून नंतर ऐसपैस पाय पसरलेला महाधूर्त चीन ) यांच्यात वर्षानुवर्ष सुरु असलेला जीवघेणा संघर्ष ज्या नंदांवनाचं महाभारतानंतरच्या भयाण कुरुक्षेत्रात रूपांतर करून गेला, त्या भूमीतल्या एका मूळच्या सुखवस्तू काश्मि...