पुरुषार्थ या शब्दाचा लौकिकार्थ जरी पुरुषांच्या पराक्रमाशी निगडित असला, तरी बरेच वेळा काही स्त्रिया आपल्या कर्तृत्वाने त्या शब्दातला 'पुरुष' या लिंगभेदात्मक शब्दाचा विसरायला भाग पाडतात. अशा वेळी जातपात, धर्म, देश असे सगळे भेद दूर सारून अशा व्यक्तींच्या फक्त कर्तृत्वाला सलाम करावासा वाटतो आणि आणि स्वतःतला पुरुषी अहंकार क्षूद्र वाटायला लागतो.ध्यानीमनी नसताना केवळ एका छोट्याश्या गैरसमजुतीमुळे माझी भेट अशाच एका विलक्षण ' दाम्पत्याशी ' झाली आणि त्या व्यक्तींच्या आयुष्याचा प्रभाव पडून आजूबाजूच्या माणसांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन तीनशे साठ अंशांनी बदलला. एका क्लायंटच्या ऑफिसमध्ये रिसेपशनिस्ट असलेली ' लिन्टा ' फिलिपिन्स या एका हजारो बेटांचा समूह असलेल्या एका निसर्गसुंदर देशातून दुबई मध्ये नोकरीसाठी आलेली होती. या देशात विधात्याने सौंदर्य आणि लावण्य मुक्त हस्ताने वाटलेलं असल्यामुळे तिथल्या मुलींना फ्रंट ऑफिसशी संबंध असलेल्या सगळ्या कामांसाठी आखातात चांगली मागणी आहे आणि म्हणूनच फिलीपिन्सची जवळ जवळ एक कोटी लोकसंख्या आखाती देशांमध्ये अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने...
दुबईच्या माझ्या वास्तव्यात मी काम केलेल्या जवळपास सगळ्या ऑफिसमध्ये मला असंख्य वल्ली भेटलेले आहेत. वेगवेगळ्या देशाचे, जातीचे, धर्माचे आणि वंशाचे लोक या अनोख्या देशात कामाच्या निमित्ताने आलेले असल्यामुळे हा देश एका अर्थाने 'सर्वसमावेशक' देश बनलेला आहे. इथे सगळेच जण या ना त्या रूपाने 'एकाच उपऱ्या जातीचे' असल्यामुळे अनौपचारिकतेच्या सगळ्या भिंती हळू हळू गळून जाऊन एकमेकांशी संवाद सुरु व्हायला विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. माझ्या पहिल्यावहिल्या ऑफिसमध्येही अशा सगळ्या वातावरणात आठवड्याभरातच मी बऱ्यापैकी रुळल्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा घरापासून दूर देशात एकटा राहायची माझी पहिली वेळ माझ्यासाठी विशेष तापदायक ठरली नाही. ऑफिसमध्ये माझ्या सहकाऱ्यांपेक्षा आधी परिचय झालेला ' रेशम ' हा आमच्या ऑफिसचा ' टी बॉय '. नेपाळमधल्या पोखरा शहरातून चार-पाच वर्षांपूर्वी दुबईला आमच्या ऑफिसमध्ये आलेला हा मनुष्य अतिशय चुळबुळ्या आणि बडबड्या होता. सुरुवातीला नावामुळे मला 'मादी' वाटलेला हा 'नर' खरं तर 'नरपुंगव' सदरात मोडणारा होता. अंगापिंडाने मजबूत आणि काटक असलेल...