मागच्या पंचवीस वर्षांपासून जगाची एकमेव महासत्ता हे बिरुद अभिमानाने मिरवणाऱ्या अमेरिकेत जाऊन अनेक जाती-धर्म-पंथ-देशाच्या लोकांनी आपली भरभराट करून घेतलेली आहे. संधींची उपलब्धता, गुणग्राहकता, विचारस्वातंत्र्य आणि मेहेनतीचा हमखास मिळणार परतावा अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे अमेरिकेला जाऊन तिथलं नागरिकत्व मिळवणं आणि त्यानंतर सुखसमृध्दीचं जीवन जगणं ही स्वप्न बाळगणारे हजारो तरुण जगाच्या कानाकोपऱ्यातून अमेरिकेत वास्तव्याला गेले. मागील काही वर्षांपासून मात्र अनेक राजकीय कारणांनी या 'अमेरिकन ड्रीम' ला अमेरिकेच्याच राजकारण्यांनी वेसण घालायचं काम करायला सुरुवात केली, ज्यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रस्थापित झालेला एक ' पॅटर्न' कुठेतरी खंडित झाला. आजसुद्धा अनेक लोक या ना त्या पद्धतीने अमेरिकेत प्रवेश करून तिथल्या 'ग्रीन कार्ड' च्या मागे लागलेले दिसतात। अरब जगतात काही ना काही करून अमेरिका किंवा अगदीच नाही जमलं तर कॅनडाच्या नागरिकत्वाचे तरी सोपस्कार पूर्ण करून आपल्या देशाच्या नागरिकत्वातून स्वतःची आणि कुटुंबीयांची 'सुटका' करण्याची चढाओढ चाललेली दिसते. सीरिया, लेबनॉन, पॅ...